Home क्राईम चाळीसगावात वृध्दाचे तोंड दाबुन जबरी हजार रूपये लांबविले

चाळीसगावात वृध्दाचे तोंड दाबुन जबरी हजार रूपये लांबविले


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील एका ६५ वर्षीय वृध्दाचे तोंड दाबून एका तरूणाने त्यांच्या खिश्यातील १ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रामदास दौलत पाटील (वय-६५) रा. हिरापुर ता. चाळीसगाव. सेवानिवृत्त आहे. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते शहरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम समोर आले. त्यावेळी संशयित आरोपी सनी विष्णु चव्हाण (वय-२२) रा. वडगाव गंगापुर जि.औरंगाबाद या तरूणाने मागून येवून त्यांचे तोंड दाबुन त्यांच्या खिश्यात असलेले १००० रूपयांची रोकड काढून घेतले व पसार झाला. दरम्यान रामदास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.


Protected Content

Play sound