यावल, प्रतिनिधी | भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश चौधरी , सचिवपदी शब्बीर खान , उपाध्यक्षपदी सचिन नायदे यांची निवड करण्यात आली.
भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सुशीला रमेश चौधरी विद्यालय किनगाव येथे संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल व प्रदेश सचिव जिवन मुरलीधर चौधरी यांच्या उपस्थीतीत संम्पन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजेंन्द्र एकनाथ पाटील हे होते. बैठकीच्या सुरूवातीस कोरोनाच्या संकटमय काळात वृत्ता लेखणीचे कार्य करतांना अक्समातरित्या मरण पावलेले पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबातील मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात सविस्तर धर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय बनसोड यांच्या आदेशान्वये भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जिल्हा ग्रामिण विभागाचे अध्यक्षपदी चुंचाळे येथील पत्रकार प्रकाश रामदास चौधरी तर जिल्हा ग्रामिण उपाध्यक्षपदी किनगाव येथील पत्रकार सचिन रामकृष्ण नायदे यांची तसेच जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार आर.ई. पाटील आणी जिल्हा समन्वयकपदी हिंगोणा येथील पत्रकार रणजीत रमेश भालेराव व विभागीय संघटकपदी डांभुर्णी येथील पत्रकार मनोज सुकनाथ नेवे तर जिल्हा सचिवपदी हिंगोणा येथील पत्रकार शब्बीरखान सरवरखान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीस अय्युब पटेल, सुनिल गावडे, जिवनचौधरी, शब्बीरखान, आर.ई.पाटील, मनोज नेवे, नितीन बडगुजर, अनिल न्हावी, सुनिल पिंजारी, रविंन्द्र आढाळे, रणजीत भालेराव, प्रविण मेघे, प्रकाश चौधरी, बाबूलाल पाटील, फिरोज तडवी, सचिन नायदे व महेश पाटील यांच्यासह इतर पत्रकार प्रामुख्याने उपस्थीत होते. बैठकीचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार महेश पाटील यांनी मानले.