टी-२० सामन्यात भारताचा दारूण पराभव

दुबई वृत्तसंस्था | शाहीन आफ्रिदीने केलेल्या शानदार गोलंदाजीनंतर बाबर आझम आणि रिझवानच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे पाकिस्तानने टी-२० विश्‍वचषकातील सामन्यात भारताचा दहा गडी राखून दारूण पराभव केला.

पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत भारताचा तडाखेबाज सलामीवीर रोहित शर्माचा बळी घेतला. त्याने रोहितला पायचित पकडलं. यानंतर तिसर्या षटकात शाहीननेचे सलामीवीर के एल राहुलचा त्रिफळा उडाला. यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहलीने सावधगिरीने फलंदाजी केली. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर विराटने सूत्रे हाती घेऊन टोलेबाजी केली. मात्र दुसर्या बाजूने क्रमाक्रमाने फलंदाज बाद होत गेले. शेवटी विराटची झुंजदेखील संपली. आणि भारतीय संघ २० षटकांमध्ये ६ बाद १५१ इतकी धावसंख्या गाठू शकला.

यामुळे पाक संघासमोर जिंकण्यासाठी १५२ धावांचे टार्गेट मिळाले. दरम्यान, पाकच्या बाबर आझम आणि रिझवान या सलामी जोडीने पहिल्या काही षटकांमध्येच आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. यानंतर या दोघांनी नाबाद १५२ धावा करून पाकचा विजय साकार केला. यामुळे पाकने भारताचा तब्बल १० गडी राखून दारूण पराभव केला.

Protected Content