Home Cities अमळनेर पंधरा हजाराची लाच भोवली; पोलीस नाईकाला रंगेहात पकडले

पंधरा हजाराची लाच भोवली; पोलीस नाईकाला रंगेहात पकडले


अमळनेर प्रतिनिधी । तक्रारदाराचे वडील व भाऊ यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत चार्जशिट लवकर तयार करण्याच्या मोबदल्यात १५ हजाराची घेतांना मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक याला रंगेहात पकडले आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील व भाऊ यांच्या विरोधात मारवड पोलील ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात मदत करून सदर गुन्ह्याचे चार्जशीट लवकर पाठवावी मागणी तक्रारदार यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण (वय-५१) रा. जुनी पोलीस लाईन अमळनेर यांच्याकडे केली होती. यासाठी पोलीस नाईक यांनी १५ हजार रूपयांची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली. आज लाचलुचपत विभागाने सापळा रचून पोलीस नाईक भास्कर चव्हाण याला १५ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound