Home क्राईम बदनामी केल्याच्या संशयावरून महिलेला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

बदनामी केल्याच्या संशयावरून महिलेला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

0
103

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिंदी येथे एकाने नावाची बदनामी केल्याच्या संशयावरून चार जणांनी महिलेला मारहाण करून गळ्यातील २२ हजार रूपये किंमतीचा मंगळसुत्र लांबविल्याचा  प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिती अशी की, संगिता नाना पाटील (वय-४४) रा. शिंदी ता. भडगाव ता. जळगाव यांच्या मुलीचे लग्न होते. दरम्यान गावातील किरण मधुकर पाटील यांनी लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना येवू देण्यासाठी १० हजार रूपये घेतले अशी बदनामी महिलेने केल्याच्या संशयावरून किरण पाटील, अन्नपुर्णा किरण पाटील, मधुकर माणिक पाटील आणि मंगल मधुकर पाटील सर्व रा. शिंदी ता. भडगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यात अन्नपुर्णा पाटील यांनी महिलेच्या गळ्यातील  २२ हजार रूपये किंमतीची मंगलपोत चोरून नेली. याप्रकरणी संगिता पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर हे करीत आहे.


Protected Content

Play sound