बोदवड प्रतिनिधी । येथील शासकीय विश्रामगृह येथे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचा कार्यकर्ता मोळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला आहे.
तालुक्यातील बोदवड येथे शासकीय रेस्ट हाऊस येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे संघटनेचे मुख्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू मराठी सिनेमा चे डायरेक्टर विशाल वाघ साहेब फुगे फेम अण्णाभाऊ सुरवाडे, बोदवड तालुका अध्यक्ष रामेश्वर लोहार, उपअध्यक्ष सुरेश कोळी, तालुका सचिव संतोष चौधरी, तालुका संपर्क प्रमुख भास्कर लोढु पारधी, तालुका संघटक समाधान प्रकाश पारधी, मीडिया प्रमुख जितेंद्र गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष पवन लोहार, तालुका सदस्य राजू फकिरा, तालुका सदस्य गोपीचंद सुखदेव सुरवाडे, तालुका सदस्य विवेक पुरुषोत्तम लोहार, तालुका कार्याध्यक्ष शेख नसीरुद्दीन, समा समा सुदिन तालुका संघटक दीपक कळसकर, तालुका कार्यालय प्रमुख देविदास शेळके, तालुका सदस्य रमेश पवार, तालुका सदस्य चरणदास शामराव, किनलगे तालुका कार्यकारणी सदस्य अशोक तायडे, तालुका संघटक विवेक पुरुषोत्तम लोहार व सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मिलनाचा कार्यक्रम पार पडला.
त्याप्रसंगी विशाल वाघ यांनी संघटनेच्या कामाबद्दलची माहिती करून दिली व जीवन जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या संघटनेत माणसाने कार्यरत राहावे, असे सांगितले गुलाब मामू यांनी संघटनेविषयी माहिती देऊन संघटना गोरगरिबांना शासकीय योजनांचे व काही अन्याय झाल्यास अन्यायाविरुद्ध लढा देऊन न्याय देण्याचे काम करीत असते संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून कामाला लागावे असे सांगून भगवान इंगळे यांना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार सुरेश कोळी यांनी केला. अध्यक्ष यांनी केला इंगळे यांनी भ्रष्टाचाराचे बरेच मुद्दे मांडून जनजागृतीची माहिती दिली. अण्णाभाऊ यांनी संघटनेविषयीचे परखड विचार मांडून माहिती दिली.
याप्रसंगी बोदवड तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून ग्रामीण भागातून आलेले सुनील काटे, अनिल कुंभार, सरस्वत दिन जिस दिन काजी, महाशन सुरडकर, मोहन माळी, विलास जंजाळ, गायक मोहन बोदळे, सुनील वानखेडे, राजाराम शेजुळे, ग्रामीण भागातील आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.