Breaking News : मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन

मुंबई प्रतिनिधी | भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील जमीन गैरव्यवहार काही दिवसांपूर्वीच मंदाताई खडसे यांच्या विरूध्द अजामीनमात्र वॉरंट बजावण्यात आले होते. यामुळे आता पुढे नेमके काय होणार याबाबत उत्सुकता लागून होती. या पार्श्‍वभूमिवर, मुंबई उच्च न्यायालयाने आज मंदाताई खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सध्या ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच मंदाताई खडसे यांच्या विरोधात मुंबई सेशन कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. या पार्श्‍वभूमिवर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी करण्यात आली. यात उच्च न्यायालयाने सौ. मंदाताई खडसे यांना तूर्तास अटक करण्यात येऊ नये असा निर्णय दिला. LiveTrends News

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देखील खडसे यांना हायकोर्टानं दिले आहेत. यामुळे खडसे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Protected Content