यावल प्रतिनिधी । तालुक्यातील श्री मनुदेवी देवस्थान परिसरातील भाविकांसाठी किनगाव आरोग्य विभागाच्या वतीने क्षयरोगावर मात करण्यासंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती शिबीर घेण्यात आले.
किनगाव आरोग्य विभागाच्या वतीने आज बुधवारी १३ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील श्री मनुदेवी देवस्थान परिसरात भाविक व ग्रामस्थांसाठी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले देवालये घटस्थापनापासून सुरू करण्यात आले आहे. या निमित्ताने मंदीर परिसरात नवरात्रोत्सवात भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होत आहे.
या निमित्ताने नागरिकांमध्ये आपल्या आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम घेण्यात आला. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी प्रभारी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांच्या सुचनेवरून क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे, क्षयरोग पर्यवेक्षक मिलींद राणे, आशा कर्मचारी मंगला पिंट्या बारेला, मानापुरी, मनिषा राजेंद्र पाटील, आशा रज्जाक तडवी, शाईन सिकंदर तडवी, गट प्रवर्तक कुर्शाद मासुम तडवी, मिना तायडे, प्रतिभा सोनवणे यांनी या क्षयरोग दुरीकरण जनजागृती मोहीमेत आपला सहभाग नोंदवला.