जळगाव, प्रतिनिधी | अखिल भारतीय जिवा सेना या संघटनेकडून शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंती सेवा सप्ताहाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी पांजरा पोळ संस्था नेरी नाका येथील गो शाळेत गायींना चारा खाऊ घालून त्यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी गुरांचे डॉ. डी. एस. पाटील यांनी तपासणी केली. त्यानंतर नेरी नाका स्मशानभूमी येथे साफसफाई मोहीम राबवण्यात आली. स्मशानभूमीत साफ सफाई व गो शाळेत गाईंना चारा पाणी वैद्यकीय तपासणी असा हा उपक्रम राबवण्यात आला. सामान्य रुग्णालय येथे शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर रोजी रुग्णांना फळ वाटप करण्यात आला. या वेळी सिव्हिल हॉस्पिटल चे डॉक्टर व सर्व मान्यवरांच्या हस्ते सफरचंद मोसंबी व केळे या फळांचे सर्व रुग्णांना वाटप करण्यात आले. शनिवार दि. ९ ऑक्टोबर रोजी नेहरू नगर मोहाडी रोड जिवा सेना शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष विशाल कुंवर यांच्या पार्लर येथे मोठ्या शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जनता बँकचे गणेश कॉलनी शाखा मॅनेजर डी. एल. महाले, नगरसेविका सुरेखा तायडे, समाजसेवक भरत बेंडाळे ,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे , जेष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब जगताप सुभाष कुंवर ,जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप ,जिल्हा संघटक प्रकाश आप्पा झुरके , जिल्हा सह सचिव संजय सोनवणे, शहर अध्यक्ष विशाल कुंवर, शहर सचिव विजय कुंवर , शहर संपर्क प्रमुख राजू जगताप , सह उपाध्यक्ष राहुल नेरपगार , तात्या फुलपगारे , नाभिक हित वर्धक संघटनेचे सचिव अनिल निकम , विकास फुलपगारे , निलेश बोरा , शहर संघटक गोरख सिरसाठ, किरण सोनवणे, दीपक कुंवर, भूषण कुंवर , छोटू ठाकरे, संदीप बोरसे. सागर सनांसे ,बापू आदी समाज बांधव उपस्थित होते.