जळगाव,प्रतिनिधी | प्रभाग ७च्या नगरसेविका दीपमाला मनोज काळे व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कॉलनी हनुमान मंदिर येथे चार दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराप्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगसेविका दीपमाला काळे, मनोज काळे, रेखा वर्मा, डॉ. रितेश पाटील आदी उपस्थित होते. गणेश कॉलनी परिसरातील व शहरातील नागरिकांचे जास्तीत जास्त संख्येने लसीकरण व्हावे या हेतूने लसीकरण शिबीर घेण्यात येत आहे. तरी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका दीपमाला काळे यांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नगरसेविका दीपमाला काळे यांनी जवळपास १५०० नागरिकांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/271457231514075