भुसावळ प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर भाजप सरकार केंद्रीय यंत्रणा सुडबुध्दीने कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील साकेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचच्यावतीने आज रास्ता रोको करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर केंद्रातील भाजपा सरकार केंद्रीय यंत्रणाचा वापर करून सूडबुद्धीने कारवाई करत आहे. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव वाढत असून अजित पवार यांचे उत्कृष्टरित्या चाललेले काम केंद्रातील भाजपा सरकारला अस्वस्थ करत आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकार सीबीआय, आयकर विभाग यासारखा सरकारी संस्थांना हाताशी धरून अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देऊन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा सर्व खटाटोप सरकार पाडण्याच्या उद्देशाने करीत असल्याने भाजपा राज्याच्या सरकारमध्ये नसल्याचे शल्य भाजपला बोचत आहे. त्यामुळे थेट पवार कुटुंबावर अशा प्रकारचे सुडबुध्दीने कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ म्हणून आज भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर निषेध व्यक्त करत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर. पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, सोहेल कुरेशी, जितेंद्र मराठे, निखिल पाटील, किशोर पाटील, एकनाथ मांडे, आकाश खडसे, निलेश मांडे, भागवत पाटील, मंगेश पाटील, अनिल पाटील, शकील पटेल, अजय कोळी, विनायक पाटील आणि किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/624528138551728