खामगाव प्रतिनिधी । मिशन कवच-कुंडल अभियान अंतर्गत श्री महारुद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आज १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लसीकरण उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यातील कोवीड लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच-कुंडल अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या अनुषंगाने सिव्हील लाईन, भिसे प्लॉट मध्ये आयोजित लसीकरणास नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत 63 नागरिकांनी covishild चा पाहिला व दुसरा डोज घेतला. यावेळी समता कॉलनी, घाटपुरी नाका, जलंब नाका, डी पी रोड, सराफा, सुटाला, सिंधी कॉलनी, देशमुख प्लॉट सह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
उपक्रमासाठी खामगाव सामान्य रुग्णालया चे वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर निलेश टापरे यांचे मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ प्राची निचळ ,परिचारिका सुमन मात्रे, आशा सेविका भारती जाधव, प्रियंका चोपडे, चालक अवचार यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच लसीकरण यशस्वी करण्यासाठी माँ वैष्णवी रुद्र नवरात्री उत्सव मंडळ, महारुद्र सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. अशी माहिती पत्रकार तसेच मंडळाचे सदस्ये श्रीकांत भुसारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.