जळगाव, प्रतिनिधी | भाऊसाहेब राऊत विद्यालयात विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी नव प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देऊन त्यांचे ऑक्सिजन व शरीराचे तापमान मोजण्यात आले. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, पर्यवेक्षक एस. एम. रायसिंग, सर्वशिक्षा अभियान अपंग युनिट कार्यालयाच्या भारती चौधरी, सौ.जोशी अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार पी. बी. मेंढे यांनी मानले.यशस्वीतेसाठी रतीलाल पाटील, कैलास सपकाळे, सागर हिवराळे, राजेंद्र सपकाळे यांनी कामकाज पहिले.