Home Cities पारोळा बोले येथे विवाहितेचा विनयभंग; पारोळा पोलीसात एकावर गुन्हा

बोले येथे विवाहितेचा विनयभंग; पारोळा पोलीसात एकावर गुन्हा


पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बोले येथे ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील बोरी येथे राहत असलेल्या ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहतात. गावातील दिलीप पुंडलिक निकम हा १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महिलेच्या घरात अनधिकृतपणे घुसला व महिलेशी अंगलट करत तिचा विनयभंग केला. दरम्यान तिला मारहाण करून शिवीगाळ देखील केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दिलीप निकम याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.


Protected Content

Play sound