मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील गोरक्षगंगा नदीवरील कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी सांडव्याच्या कामाला आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, जोंधनखेडा गावाजवळ गोरक्ष गंगा नदीवर असलेल्या कुंड धरणाचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरस द्वारे तर प्रत्यक्षात धरण स्थळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, याच कार्यक्रमात कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी आणि सांडव्याचे उर्वरित काम पुर्ण करण्यासाठी ३० कोटी ८४ लक्ष निधी मंजुर करून आणल्याबद्दल माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचा कुर्हा वढोदा परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान ,सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे व रोहिणी ताई खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची गाव खेड्यात ताकद वाढली असून येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपालिका व सहकार क्षेत्रातील निवडणुकात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला यश मिळेल. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराचे एकदीलाने काम करून पक्षाला यश मिळवून द्यायचे आहे अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि इतर विकास कामांसाठी आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. आपले सरकार आहे त्याच्या माध्यमातून निधीची कमतरता भासणार नाही नाथाभाऊ यांचा शब्द, निधीची मागणी अजित दादा पवार, जयंत पाटील साहेब व इतर नेते पूर्ण करतात म्हणून आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही असे ते म्हणाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्याकडे कुंड धरणाची उंची वाढविणे आणि सांडव्याचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सुप्रमा आणि निधी देण्यात यावा अशी २० ऑगस्ट च्या बैठकीत मागणी केली होती. त्यावर त्यांनी तत्काळ ३० कोटी ८४ लक्ष निधीची तरतुद केली. आज नाथाभाऊ, मी आणि रवींद्र भैय्या पाटील आमदार-खासदार नाही आहोत. तरी नाथाभाऊ यांच्या शब्दाला सरकार मध्ये वजन आहे.
व्हिडीओ कॉन्फरस द्वारे मनोगत व्यक्त करताना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर बोदवड रावेर तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा वढोदा उपसा सिंचम योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना, जोंधनखेडा धरण व उत्तर महाराष्ट्रातील अनेक उपसा सिंचन योजना व धरणांची मुहूर्तमेढ रोवली. त्या पूर्ण होण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्याचे बहुतांशी काम पूर्णत्वास येत असून राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी एकनाथराव खडसे, रोहिणी ताई खडसे या सतत पाठपुरावा करत असतात आम्ही सरकार म्हणून या योजनांचा निधी देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नुकतेच रोहिणीताई खडसे यांनी भेटूनमुक्ताईनगर मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आंम्ही २० ऑगस्ट रोजी मंत्रालय मध्ये सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. त्यात सर्व सिंचन योजनांचा आम्ही आढावा घेतलारोहिणी ताई यांनी मागणी केल्या नुसार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजने द्वारे ओझरखेडा धरणात पाणी टाकले.या बैठकीत त्यांनी जोंधनखेडा येथील गोरक्षगंगा नदी वरील कुंड धरणाच्या मातीच्या भिंतीची उंची वाढवावी व सांडव्याचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी निधी मिळावा अशी मागणी केली होतीत्यानुसार या प्रकल्पाच्या कामासाठी ३० कोटी ८४ लक्ष रुपयांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यातून या प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढविण्यात येईल तसेच राहिलेले उर्वरित काम पूर्ण करण्यात येईलनाथाभाऊ यांनी दूरदृष्टी ठेऊन या प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एकनाथराव खडसे म्हणाले की, पाटबंधारे मंत्री असताना गोरक्षगंगा नदीवरील कुंड धरणाला पर्यावरणाच्या वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळवून देऊन धरणाच्या कामाचे भूमिपूजन केले त्यानंतर धरणाचे काम पूर्णत्वास नेले आज जयंतराव पाटील आणि माझ्याहस्ते धरणाचे जलपुजन होत आहे. भूमिपूजन ते जलपुजन करण्याचे भाग्य लाभलेला कदाचित मी पहिला व्यक्ती असेल. धरणाची उंची वाढवावी अशी परिसरातील लोकांची मागणी होती त्यानुसार रोहिणी ताई खडसे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला त्याला जयंतराव पाटील यांनी तात्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. याचप्रमाणे मि जयंतराव पाटील यांना कुर्हा वढोदा इस्लामपुर प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन धरण स्थळावर आढावा बैठक घेऊन अपूर्ण असलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जावे यासाठी सुद्धा आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे.
एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, गेल्या चार दिवसा पासून विरोधक एकनाथ खडसे यांना ईडीने अटक केली, मालमत्ता जप्त झाली अशी अफवा पसरवत आहेत परंतु मी कोणताही गुन्हा केलेला नाही सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. गेल्या चाळीस वर्षा पासून तुम्ही सर्व मला ओळखत आहेत चाळीस वर्षात कोणताही भ्रष्टाचार केला नाही. परंतु एका व्यक्तीच्या कट कारस्थानातुन माझ्यावर आरोप झाले. मी बि एच आर पतसंस्थेचे गैरव्यवहार बाहेर काढले म्हणून माझ्या मागे ईडी लावण्यात आली बि येऊ९आर च्या ठेवीदारांच्या ठेवी वर यांनी दरोडे घातले. मी संकटात असताना शरद पवार साहेब, अजित दादा पवार, जयंतराव पाटील यांनी मला भक्कम साथ दिली. मी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विस्ताराचा शब्द दिला आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने मला तो खरा करून दाखवायचा आहे. हिवरा, उमरा ,पारंबी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा उघडण्यात येऊन शाखा फलकांचे अनावरण करण्यात आलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल महाराज खोले यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच रवींद्र पाटील यांनी केले यावेळी परिसरातील नागरिक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्यापाटील,जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू सेठ महाजन,सरचिटणीस ईश्वर रहाणे,अशोक पाटील,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील,मुक्ताईनगर पं. स. सभापती सुनिता चौधरी,बोदवड पं. स. सभापती किशोर गायकवाड ,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया,राष्ट्रवादी सोशियल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, युवक जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना ताई कांडेलकर, युवक तालुका अध्यक्ष शाहिद खान, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा पाटील, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, जि. प. सदस्य निलेश पाटील, माजी जि. प. सदस्य सुभाष पाटील, जेष्ठ नेते सुधाकर पाटील, रमेश पाटील, नगरसेवक सुनिल नेवे,अशोक लाड वंजारी,पंकज येवले, सय्यद असगर, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, बोदवड गटनेते कैलास चौधरी, जिल्हा दूध संघ संचालक मधुकर राणे,सुभाष टोके बाजार समिती संचालक विलास धायडे, दशरथ कांडेलकर ,रामदास पाटील, कैलास पाटील, शहराध्यक्ष राजु भाऊ माळी,प स सदस्य विकास पाटील, प्रदिप साळुंखे,तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, सुनिल काटे,संदिप देशमुख,सुधाकर जावळे, दिपक मराठे, निळकंठ चौधरी,मेहबूब खान, डॉ बि सी महाजन,नगरसेवक मस्तान कुरेशी, शकील सर, बापू ससाणे,ओमप्रकाश चौधरी, पुंडलीक कपले,अतुल युवराज पाटील,उसामा खान ,हिवरा उपसरपंच रवींद्र पाटील,इकबार तडवी,सचिन महाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.