Home Cities यावल कॉंग्रेसतर्फे महात्मा गांधी व शास्त्रीजींना अभिवादन

कॉंग्रेसतर्फे महात्मा गांधी व शास्त्रीजींना अभिवादन

0
25

यावल प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथे कॉंग्रेस समितीतर्फे अभिवादन करण्यात आले.

यावल येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देश स्वातंत्राचे थोर महापुरुषांच्या जयंतीनिमित्तावे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभीवादन करण्यात आले.

ब्रिटीशांच्या तावडीतुन देशाला स्वात्रंत मिळवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे महत्वपुर्ण योगदान असुन , स्वातंत्राच्या ७५ वर्षानंतर पुन्हा कॉंग्रेसला देशातील जातीवादी शक्ती पासुन देशाला मुक्त करण्यासाठी पुनश्च आपल्याला चळवळ उभी करून लढा द्यावा लागणार आहे. कॉंग्रेस हे केवळ पक्ष नसुन एक विचार आहे असे मनोगत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणी माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले .

याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , कौग्रेस कमेटीचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगरसेवक मनोहर सोनवणे , नगरसेवक समिर शेख , पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी ,कॉंग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान, ग्रामीण कॉगेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल, आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी यांच्यासह आदी पक्षाचे कार्यकर्त व पदाधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound