Home प्रशासन जिल्हा परिषद जिल्हा पंचायत नियोजन समिती सदस्यपदी निर्मला पाटील यांची निवड

जिल्हा पंचायत नियोजन समिती सदस्यपदी निर्मला पाटील यांची निवड

0
34

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यात जिल्हा पंचायत नियोजन समितीची स्थापन करण्यात आली असुन समिती सदस्यपदी किनगाव बु॥ येथील सरपंच निर्मला पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

निर्मलाताई पाटील यांच्या निवडीबद्दल माजी आमदार रमेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील ( नाना), जिल्हा परिषद सदस्या अरूणा पाटील, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य उमाकांत पाटील, माजी सरपंच व वि.का.सो.चे चेअरमन टिकाराम चौधरी, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चौधरी, उपसरपंच लुकमान कलंदर तडवी, किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील इतरांसह ग्राम विकास आधिकारी ग्राम पंचायत सदस्य किनगावसह परीसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound