Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक रूग्ण

कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक रूग्ण

0
20

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रुग्ण आढळला असून एक रुग्ण बरा झाला आहे  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४३  बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख ४० हजार १५९  रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९ रुग्ण ॲक्टिव्ह असून आज एक रुग्ण जळगाव शहरात आढळला आहे तर एक रुग्ण बरा झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 


Protected Content

Play sound