यावल प्रतिनिधी । शहरातील नवीन कुंभार वाड्यामध्ये नवयुवक कुंभार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या फलकाचे अनावरण ॲड. गोविंद बारी यांनी केले.
यावेळेस समाजहितासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेचे कामकाजाची विषयाची ॲड. गोविंद बारी यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. कुंभार समाज हा अत्यंत कष्ठकरी समाज असुन असे असतांना समाजाला अनेक समस्या आणी अडचणींना सामोरे जावे लागते. अशा प्रसंगी न्याय मिळावा, या करीता संस्थेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी सांगितले. या वेळेस नवयुवक कुंभार समाज बहुउद्देशीयसंस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पंडित, राजू कुंभार, पिंटू कुंभार ,छोटू कुंभार, किरण कुंभार, युवराज कुंभार ,यांच्यासह कुंभार समाजातील ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन पिंटू कुंभार यांनी केले.