रावेर तालुक्यात खरीप अनुदान वाटपाच्या लाभार्थ्यांची तपशील जाहीर करावी- राजन लासुरकर

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात खरीप अनुदान वाटप प्रकरणात तालुका प्रशासनाने लाभार्थ्यांची संपूर्ण तपशील जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांनी केली आहे.

रावेर तालुक्यातील खरीप अनुदान वाटप २०१९ प्रकरण वादाच्या भोवऱ्यात आहे. २०१९ वर्षी मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती. स्व. माजी आ हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नामुळे भाजपा सरकारने रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करोडो रूपयांचे अनुदान दिले होते. रावेर प्रशासनाने लाभार्थांची संपूर्ण तपशील जाहीर करावी. यात किती शेतकऱ्‍याचे किती हेक्टरचे नुकसान झाले होते. कपाशी उत्पादक बाधीतांना किती भरपाई दिली होती. केळी उत्पादक बाधीतांना किती भरपाई दिली. इतर पिक उत्पादकांना किती निधी दिला. त्याचे पंचनामे कसे केले तसेच एकूण किती शेतकऱ्‍यांना खरीप अनुदान २०१९ वाटप करण्यात आले होते. शासनाकडून किती रक्कम शेतकऱ्‍यांसाठी आली होती. त्यातील किती रक्कम शासनाला समर्पीत केली यासह अनुदान संदर्भात इतर तपशील तहसिलने जनते समोर मांडण्याची मागणी भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी केली आहे.

 

Protected Content