Home क्राईम गाव अवघ्या दोन किलोमीटरवर असताना अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण ठार

गाव अवघ्या दोन किलोमीटरवर असताना अपघात; एकाच कुटुंबातील पाच जण ठार


accident

बुलडाणा (वृत्तसंस्था) गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना अपघात होत पाच जण ठार तर पाच जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एकाच कुटुंबातील पाच जण या अपघातात मयत झाले असून जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जुमडे कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान महू येथे दर्शनासाठी गेले असता, तेथून परत येत असताना सोमवारी पहाटे मेहकर-डोनगाव रोडवर अंजनी फाट्याजवळ हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील गोलू जुमडे, राजरत्न जुमडे, कोमल जुमडे, मनोहर जुमडे आणि जयंतीबाई जुमडे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून त्यामधील 2 गंभीर आहेत. गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असतांना हा भीषण अपघात झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound