Home Cities जळगाव भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुखपदी प्रतिक शेठ

भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सहप्रमुखपदी प्रतिक शेठ

0
46

जळगाव, प्रतिनिधी । जैन समाजाचे सक्रिय सदस्य, सामाजिक युवा कार्यकर्ता प्रतिक शेठ यांची भाजपा जैन प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र विभागीय सह प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

 

भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रतिक शेठ यांची माजी मंत्री आमदार  गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.  या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष  चित्राता वाघ, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, वरिष्ठ नेते राज पुरोहित, महिला प्रदेश प्रमुख इशा कोलीकर, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक संघटनेचे अध्यक्ष ललित गांधी, भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी आणि असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. जळगाव ग्रामीणचे  जिलाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष   दीपक सूर्यवंशी, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांची नियुक्तीचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

 


Protected Content

Play sound