Home Cities एरंडोल एरंडोल येथील नवीन वसाहतीत रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी

एरंडोल येथील नवीन वसाहतीत रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी

0
50


एरंडोल प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांम ७ अर्थात नवीन वसाहतीत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांवर मुरूम टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते इश्वर बिऱ्हाडे यांनी मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.७ मधील नविन वसाहती हिंगलाज कॉलनी, न्यु.लक्ष्मी नगर, शंकर नगर, गणपती नगर, न्यु.साईबाबा नगर, प्रभा नगर यासह इतर परिसरात पावसामुळे सर्वत्र मोठ्याप्रमाणावर खड्डे पडल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे  रहिवाशांना मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर मुरुम टाकावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ईश्वर बिऱ्हाडे, दिपक पाटील, ज्ञानेश्वर ताडे, संभाजी शिंपी, गणी टकारी, भागवत आरखे, अनिल महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 


Protected Content

Play sound