Home आरोग्य जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 07 हजार जणांना कोरोना लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 07 हजार जणांना कोरोना लसीकरण

0
30

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 7 हजार 246 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 15 लाख 17 हजार 818 जणांना पहिला डोस तर 4 लाख 89 हजार 428 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 15 लाख 17 हजार 818 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 4 लाख 89 हजार 428 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 20 लाख 7 हजार 246 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 8 लाख 70 हजार 432 तर ग्रामीण भागातील 11 लाख 36 हजार 814 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज मंगळवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 


Protected Content

Play sound