देवेंद्र फडणवीस अजित पवारांना खिशात घालून फिरतात: चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे | ”देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका, ते अजित पवार सारख्यांना खिशात घालून फिरतात” असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील तणावात पाटलांच्या वक्तव्याने अजून भडका उडण्याची शक्यता आहे.

 

अलीकडच्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. यात काल रात्रीपासून किरीट सोमय्या यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला असतांनाच आता पक्षातील अन्य नेते देखील त्यांच्या मदतीला आल्याचे दिसून येत आहे.

 

आज पुण्यात पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, असं वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता कॉंग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात कॉंग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Protected Content