खुशखुबर : वाघूर धरण पूर्णपणे भरले !

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराचा पाणी पुरवठा अवलंबून असणारे वाघूर धरण आज सायंकाळी पूर्णपणे भरल्याने शहरवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रमाणात पाऊस झाला. यामुळे आज सायंकाळी पाच वाजता वाघूर धरण हे पूर्णपणे भरले. यामुळे आता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून खालील बाजूस असणार्‍या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाघूर धरणावरून जळगाव शहराला पाणी पुरवठा होत असतो. यामुळे आज वाघूर धरण पूर्ण भरल्याने जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे आता जळगावकरांना नियमितपणे पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Protected Content