जिल्ह्यात आज आढळले दोन कोरोना रूग्ण

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा आटोक्यात आली असून आज दोन रूग्ण आढळून आले आहेत.

 

आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने एका रिपोर्टच्या माध्यमातून कोरोनाचे अपडेट दिले आहेत. यात गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात दोन नवीन कोरोना रूग्ण आढळून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सुध्दा एका दिवशी एकही रूग्ण आढळून आला नव्हता. यानंतर काल सुध्दा एक रूग्ण आढळून आला होता. तर आज दोन पेशंट आढळून आले आहे. यातील एक रूग्ण भुसावळात तर दुसरा धरणगावात आढळून आला आहे. तर कोरोनामुळे आज देखील कुणाचा मृत्यू झालेला नाही.

 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये एकाही रूग्णाने कोरोनावर मात केली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात आता कोरोनाच्या लसीकरणाला देखील वेग आल्याचे दिसून येत आहे. तर जिल्ह्यात सध्या ३० सक्रीय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Protected Content