शेंदूर्णीत कोरोना लसीकरण शिबीर उत्साहात

शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या सहकार्याने आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून १५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरवातीला सकाळी ९ वाजता भगवान धन्वंतरी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन माजी खासदार उल्हास पाटील ,पहुर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी,डॉ.किरण सूर्यवंशी,राजेंद्र पवार,नगरसेविका भावना जैन, चंद्रभागाबाई धनगर, सौ.वृषाली गुजर,मोहसीना खाटीक ,गोंदेगाव सरपंच देवानंद शिंदे,तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे,प्रा.आरोग्य केंद्र अधिकारी डॉ.वानखेडे,डॉ. शुभम सावळे,डॉ.आदित्य पाटील, आरोग्य सुपरवायझर माळी, परिचारिका राजश्री पाटील,शोभा घाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी खासदार उल्हास पाटील,पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले ,उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या नियोजनामुळे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १५०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संजय गरुड यांनी लसीकरणास अभुतपुर्व प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

 

 

Protected Content