Home Cities धरणगाव इंदूरीकर महाराजांची पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट

इंदूरीकर महाराजांची पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट

0
37

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी | ख्यातनाम प्रबोधनपर किर्तनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर हे किर्तनानिमित्त आज तालुक्यात आले असता त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली.

 

निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे रविवारी सायंकाळी किर्तन आयोजीत करण्यात आले आहे. यासाठी ते दुपारीच तालुक्यात दाखल झाले. त्यांनी पाळधी येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. ना. गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी इंदुरीकर महाराजांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबत संवाद साधला. यानंतर ते दोनगाव येथे कीर्तनासाठी रवाना झाले.


Protected Content

Play sound