Home Cities जळगाव महापालिकेच्या आवारात महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते गणरायाची विधीवत स्थापना (व्हिडिओ)

महापालिकेच्या आवारात महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते गणरायाची विधीवत स्थापना (व्हिडिओ)

0
30

जळगाव, प्रतिनिधी । महापालिकेच्या आवारात आज १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांच्याहस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

 

याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, अतिरिक्त आयुक्त वर्षा गायकवाड,  नगरसचिव सुनिल गोराणे, शहर अभियंता अरविंद भोसले, समिर बोरोले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनामुळे गेल्यावर्षी कोरोनाच्या काळामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी कोरोनाची साथ आटोक्यात आली असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळ आणि गणेशभक्तांनी  पाळणे गरजचे आहे. शासनाने दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन न करता गणेशोत्सव भाविक भक्तांनी साजरा करावा असे आवाहन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बोलतांना सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/212779047559810

 


Protected Content

Play sound