यावल ( प्रतिनिधी)। आजच्या तरुणांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणी विचार आजच्या तरूणांनी आत्मसात केल्यास खऱ्या अर्थाने समाज प्रगत होईल व बाबासाहेबांना हीच खरी आदरांजली असेल, आपण आज शैक्षणिकदृष्टया सक्षम असले तरी आर्थिक दृष्टया अधिक सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे मनोगत यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावलीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी व्यक्त केले.
कोरपावली येथील विविध कार्य. सह. सोसायटीच्या सभागृहात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी करण्यात आली सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे, व्हाईस चेअरमन आरती संजय महाजन, संचालक एकनाथ चिघु महाजन, अफरोज अन्वर पटेल, बारसु रामदास नेहते, श्रीमती वर्षा घनःशाम नेहते, महेन्द्र नेहते, यशवंत निंबा फेगडे, तुळशीराम पितांबर कोळंबे, आदीवासी कार्यकर्त मुनाफ जुम्मा तडवी, यांच्या सह अनेक सामाजीक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण आदरांजली वाहिली.