रामेश्वर कॉलनीतील घरफोडीतील तीन चोरट्यांना २४ तासात पहूर येथून अटक

जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी परिसरातील तुळजामाता नगर येथे घरातच असलेले सुनंदा किराणा स्टाअर्स फोडून सुमारे रोकड आणि दागिने असा एकुण अडीच लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी फोडून लांबविल्याची घटना रविवारी ५ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता उघडकीला आला होत. दुकान फोडणारे तिघांना एमआयडीसी पोलीसांनी पहूर येथून आज सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अटक आहे. 

 

विशाल मुरलीधर दांभाडे, योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके रा. रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या तिनही संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुळजामाता नगरात सुरेश तानाजी पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्याच्या घरातच सुनंदा किराणा स्टोअर्सचे दुकाने असून त्यावर उदरनिर्वाह भागवितात. शनिवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुरेश पाटील यांनी दुकानातील दागिणे व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान बंद केले होते. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांचा मुलगा व पत्नी दोन्ही जण दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाचे शटर अर्धवट वाकविलेले तर कुलूपाला असलेली पट्टी तुटलेली दिसली.  दागिणे व रोकड ठेवलेली दुकानात बरणी तसेच डबा मिळून आला नाही. बरणीतील दागिणे व डब्यातील ६० हजार रुपयांची रोकड असा चोरट्यांनी एकूण २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन आल्याचे समोर आले.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी परिसराचा आढावा घेतला असता परिसरात राहणारा विशाल मुरलीधर दांभाडे रा. रामेश्वर कॉलनी हा चोरी झाल्यापासून गायब असल्याची माहिती मिळाली. त्याची कसून चौकशी केली असता चोरी करण्याच्या पुर्वसंध्येला दुकानाच्या परिसरात विशाल आणि त्यांचे काही मित्र फिरत होती अशी माहिती मिळाली. संशयित आरोपी हे पहूर ता. जामनेर येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, हमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांचे पथक तयार करून पहूर येथून संशयित आरोपी विशाल मुरलीधर दांभाडे, योगेश उर्फ पप्ता राजेंद्र चौधरी आणि विकास उर्फ विक्की नारायण खोडके यांना आज सोमवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता अटक केली. तिघांनी दुकान फोडल्याची कबुली दिली आहे. यातील विशाल दांभाडे हा घरफोडीतील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरोधात रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकुण ६ गुन्हे दाखल आहेत. तिघांना उद्या मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एमआयडीसी पोलीसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सचिन मुंढे करीत आहे.

Protected Content