जळगाव प्रतिनिधी | राज्य सरकारने दोन वर्षांपासून बंद केलेले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार पुन्हा सुरू करावेत अशी मागणी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केली आहे.
भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कर पुन्हा सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शाळा प्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणार्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांची उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरवण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपचे यात करण्यात आली आहे.
राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणार्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही. पुरस्कार जाहीर न केल्याने पुरस्कारविजेत्या शिक्षकांना द्यावयाच्या दोन वेतनवाढींचा मुद्दाही सरकारने बासनात गुंडाळून ठेवलाअसल्याची टीका देखील दीपक सूर्यवंशी यांनी या पत्रकातून केली आहे.