रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील तांदलवाडी येथील श्रीकांत महाजन यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना रावेर येथील कार्यक्रमात याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
रावेर येथे शनिवारी भाजपचा समर्थ बूथ अभियानाच्या अंतर्गत मेळावा पार पडला. या बैठकीत तांदलवाडी येथील रहिवासी श्रीकांत महाजन यांची भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे आणि जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच नियुक्तीपत्र प्रदान केल्यानंतर श्रीकांत महाजन यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष ना. रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, नंदा पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अजय भोळे, पंचायत समिती सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, महेश चौधरी, सुनिल पाटील, अमोल पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.