Home Agri Trends रत्नागिरीत अवकाळी पाऊस आणि गारपीट

रत्नागिरीत अवकाळी पाऊस आणि गारपीट


 

garpit
 फोटो : प्रतीकात्मक 

रत्नागिरी (वृत्तसंस्था) जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर, धामणी येथे गारांचा पाऊस झाला असून जवळपास अर्ध्यातासाहून अधिक वेळ हा पाऊस पडला. त्यामुळे हातातोंडाशी आलेले आंबा पीक हातचे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे गारांचा जोरदार पाऊस पडला. दुपारनंतर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात गारांचा पाऊस झाला. पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागाला अवकाळी पाऊसाने आज झोडपले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound