Home Cities पाचोरा पाचोरा पोलीस स्थानकातील जप्त मोटारसायकलींचा होणार लीलाव

पाचोरा पोलीस स्थानकातील जप्त मोटारसायकलींचा होणार लीलाव

0
81


पाचोरा, प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकात बेवारस म्हणून जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींचा लीलाव होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, पाचोरा पोलीस स्टेशन येथे १२ मोटार सायकल बेवारस स्थितीत मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेल्या आहेत. ही वाहने भंगार स्थितीत असुन सदर वाहनाचे मुळ मालकांनी वाहनांची ओळख पटवुन कागदपत्र सादर करुन वाहने घेवुन जाणे बाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात आली होती. परंतु अद्याप पावेतो सदर वाहनांचे मुळ मालक वाहन घेण्यासाठी अथवा वाहनावर अधिकार दाखविण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशन येथे आलेले नाहीत. ही वाहने कोणीही घेवुन न गेल्यामुळे त्यांचा दि. ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा पोलीस स्टेशन येथे लिलाव करण्यात येणार आहे.

संबंधीत वाहनांच्या लिलावात ज्यांना भाग घ्यावायाचा असल्यास त्यांनी स्क्रॅप शॉप ऍक्ट परवाना, पॅनकार्ड, आधार कार्ड, लेखी अर्ज दि. ६ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री आठ वाजेपावेतो कागदपत्रे सादर करावेत. मुदतीत अर्ज सादर न केल्यास लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशन मार्फत करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound