Home Cities जळगाव बोंबला….गॅस सिलेंडरचे मूल्य पुन्हा महागले !

बोंबला….गॅस सिलेंडरचे मूल्य पुन्हा महागले !

0
108

नवी दिल्ली | सरकारी ऑईल कंपन्यांनी आज पुन्हा विना अनुदानीत गॅस सिलेंडराच्या मूल्यात तब्बल २५ रूपयांची वाढ केली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (खजउ) ने विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केलीय. त्याचबरोबर १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

१ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलेंडर होती.

दरम्यान, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३-१५ पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलीटर किंमत आता १०१.३४ रुपये आणि मुंबईत १०७.३९ रुपये प्रतिलीटरआहे. दिल्लीत डिझेलची किंमत आता ८८.७७ रुपये आणि मुंबईत ९६.३३ रुपये प्रतिलीटर आहे.


Protected Content

Play sound