मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकार गुंडगिरीवर चालत असल्याचा आरोप करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उत्तर देत मंत्री नवाब मलीक यांनी सर्वाधीक केस असलेले नेते हे भाजपमध्ये असल्याचा पलटवार केला आहे.
राज्यसरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असून त्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत असा जोरदार टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. मलिक पुढे म्हणाले की, मोदीजी व अमित शहाजी हे ज्यापध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदींजी मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करुन दिली आहे.