Home Cities अमळनेर जानवे रस्त्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवत एकाला लुटले

जानवे रस्त्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवत एकाला लुटले

0
55


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील जानवे रस्त्यावर अज्ञात तीन दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून एकाला लुटल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अवेज अश्पाक शेख (वय-३८) रा. अविष्कार कॉलनी, चाळीसगावरोड धुळे हे कामाच्या निमित्ताने अमळनेर येथे आले होते. २५ ऑगस्ट रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीने जानवे रस्त्याने धुळ्याकडे जात असतांना अज्ञात तीन जणांनी त्यांचा पाठलाग केला. रस्त्यावर दुचाकी आडवी लावून अनोळखी तीन जणांनी हातात धारदार शस्त्र घेवून आवेज यांच्याजवळील ३ हजार रूपयांची रोकड, एटीएम कार्ड, ड्राव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, १० हजाराचा मोबाईल हातातील चांदीची अंगठी असा एकुण १३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरी लटून नेले. भांबावलेल्या अवस्थेत अवेज यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठले. आपल्यावर झालेला प्रकार पोलीसांसमोर कथन केला. अवेज यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे. 


Protected Content

Play sound