Home आरोग्य जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाख 12 हजार जणांना कोरोना लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाख 12 हजार जणांना कोरोना लसीकरण

0
23

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाख 12 हजार 526 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 8 लाख 96 हजार 757 जणांना पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 769 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज बुधवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 96 हजार 757 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 3 लाख 15 हजार 769 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 12 लाख 12 हजार 526 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 5 लाख 85 हजार 942 तर ग्रामीण भागातील 6 लाख 26 हजार 584 नागरीकांचा समावेश आहे. नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज बुधवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 


Protected Content

Play sound