पहूर येथील साहित्यिक रविंद्र पांढरे यांची ‘सायड ‘ ही कादंबरी प्रकाशित

पहूर, प्रतिनिधी ।   पहूर पेठ येथील साहित्यिक रविंद्र पांढरे यांची ‘सायड ‘ही कादंबरी पुणे येथील रोहन प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. ‘प्रत्येक बहराच्या नशीबी पाणगळ ही लिहीलेली असते ‘ या सत्याचा पुन:प्रत्यय देणाऱ्या  या कादंबरीत शेती शिवाराच्या सानिध्यात उत्स्फूर्तपणे  फुलून आलेल्या प्रगल्भ सहजीवनातील अनेक पदरी व्यामिश्र अनुभव अविष्कृत झाले आहे. 

याआधी रविंद्र पांढरे यांच्या ‘अवघाचि संसार ‘ व ‘पोटमारा ‘या कादंबऱ्या मान्यवर प्रकाशकांनी प्रकाशित केल्या आहेत. ‘अवघाचि संसार ‘या कादंबरीवर आधारित ‘घुसमट ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर ‘पोटमारा ‘ या कादंबरीचा उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या एम. ए.च्या अभ्यासक्रमात  समावेश झाला आहे. ‘मातितली माणसं ‘ या त्यांच्या कथासंग्राहास शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कादंबरी ‘सायडच्या ‘ प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवरांनी ‘सायड’ चे स्वागत आणि रविंद्र पांढरे यांचे अभिनंदन केले आहे.

 

Protected Content