चाळीसगाव प्रतिनिधी । आमदार मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला आज आदिशक्तीचे जागृती शक्तिपीठ असलेले पाटणादेवीचे आज सकाळी पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्या समवेत दर्शन घेवून चाळीसगाव तालुकावासीयांचे सुदृढ आरोग्यासाठी देवीला साकडे घातले.
आ. मंगेश चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला २२ ऑगस्ट रोजी आदिशक्तिचे जागृत शक्तिपीठ असणा-या पाटणानिवासिनी माता चंडिकेचे आज सकाळी धर्मपत्नी शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या समवेत दर्शन घेत अभिषेक घातला. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ते देवीला चाळीसगावकरांना सुदृढ आरोग्य लाभू दे असे साकडे त्यांनी घातले व भाविक भक्तांसोबत महाप्रसादाचा लाभ घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकार केल्या.
यावेळी पाटणा ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, पाटणा पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पाटणादेवी मंदिर येथे फुल – हार विक्री करणारे व्यावसायिक यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच नितीन पाटील, उपसरपंच कैलास चव्हाण, माजी सरपंच आनंदा सोनवणे, गोरख चौधरी, ग्रामपंचायत सदस्य वसराम पवार, सुनील घाडगे, भिमाभाऊ जाधव, मच्छीन्द्र घाडगे, परशुराम शितोळे, सतीश निकम, मधुकर चौधरी, जगनभाऊ पाटील, मनीष पाटील, उमेश आव्हाड, नितीन बोडके, दीपक पवार, श्रावण चव्हाण, मनोज चव्हाण, आबा देसले, भगवान चौधरी, बन्सीलाल चौधरी, विलास सोनवणे, बापू चौधरी, अशोक पाटील, सतीश पाटील आदी उपस्थित होते.