Home आरोग्य आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र

आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र

0
48

पारोळा प्रतिनिधी । सदानंद भावसार या राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श सेवानिवृत्त शिक्षकाला नवी दिल्ली येथील मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेने कोरोना वॉरियर प्रमाणपत्र ऑनलाईन प्रदान केले.

कोरोना काळातील तन मन व धनाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हे सन्मानपत्र देण्यात आले. भावसार सरांना यापूर्वी तब्बल २३ कोरोना योद्धा सन्मानपत्रे मिळाली असून हे २४ वे सन्मानपत्र आहे.

शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound