भडगाव : प्रतिनिधी । जीवनात माणसाचे वागणे, बोलणे, राहणीमान याचे महत्त्व आहे. त्यावरुन त्याचा प्रभाव पडतो. प्रत्येकाच्या जीवनात संकटे येतात, संकटाला न घाबरता त्यावर मात कशी करता येईल याचा सकारात्मक विचार माणसाला दिशादर्शक ठरत असतो असे विचार समुपदेक तथा संवादक गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित “सैदव सैनिक पुढेच जायचे” या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे होते. व्यासपीठावर
नाभिक महामंडळच्या महिला प्रदेश अध्यक्ष भारती सोनवणे, जिल्हाध्यक्ष रविद्र नेरपगारे, महिला जिल्हाध्यक्ष संगिता गवळी, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, राज्य कार्यकारणी सदस्य सुधाकर सणांसे, जिल्हा उपाध्यक्ष चद्रकांत शिंदे, प्रशांत बाणाईत, कीन्हीच्या संरपच निलम सोनवणे, रविद्र शिरसाठ (भडगाव), गणेश सोनवणे (चाळीसगाव), नाभिक कलादर्पण संघाचे मुकुंद धजेकर आदी उपस्थित होते.
गिरीष कुलकर्णी पुढे म्हणाले की, कोव्हीड-१९ च्या काळात अनेक बांधवाच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले. ते रडत बसले नाही. काहीतरी नविन पर्याय शोधला. आज त्याचे व्यवहार सुरळीत सुरु आहे. “आता मी काय करु” असा विचार करत जे शांत बसले ते आजही विचारच करत आहेत . माणसे त्याच्याकडे जे सामर्थ्य, वस्तु आहे. त्यावर समाधानी नाहीत तर समोरच्या व्यक्तीकडे जे आहे. त्यामुळे दुःखी आहेत. हा संकुचित विचार माणसाला नैराश्याच्या खाईत ढकलत असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे काय आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे सामर्थ्य, वस्तु आहे त्यात समाधानी असायला हवे. हीच सकारात्मक वृत्ती माणसाला प्रगतीच्या दिशेने नेत असते.
यावेळी नाभिक समाज जिल्हाप्रवक्ता उद्योजक कुणाल गालफाडे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी संगत कीती महत्वाची व व्यवसाय वाढवताना वातावरणनिर्मिती कशी करायाची यावर मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील सरपंच , उपसरपंच सदस्य यांचा जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ. निलम सोनवणे (संरपच, कीन्ही ता. भुसावळ) , सुनिता सोनवणे (उपसंरपच जिराळी, ता. पारोळा) , ज्ञानेश्वर खोंडे (ग्रा.प.सदस्य , वरखेडी , ता. पाचोरा) , कविता सनांसे (रुईखेडा मुक्ताईनगर ) , सोनाली श्रीखंडे (चांगदेव), लक्ष्मीबाई टोंगळे, भिमराव चित्ते, जगदीश निमकर, ज्ञानेश्वर ठाकरे (नाचणखेडे ता. पाचोरा), गोपाळराव आमोदे (नायगाव ता. मुक्ताईनगर) हे या सत्काराचे मानकरी होते
भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश सरचिटणीस म्हणुन निवड झाल्याबद्दल सौ. भारती सोनवणे (अमळनेर) , मुख्यध्यापक संघ अध्यक्ष संजय वाघ (चाळीसगांव), कुणाल गालफाडे ( भुसावळ), साक्षी सापकर ( सावदा) , राजेंद्र डापसे ( बोधवड) , गणेश टोंगे (मुक्ताईनगर) , सचिन मालवेकर (यावल), जयंत महाले, दिशा सैदाणे (जळगांव), श्रीराम पर्वते , किशोर वाघ, उदय पवार, सुयोग निकम यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावल तालुकाध्यक्ष शशिकांत वरुळकर, रावेर तालुका उपाध्यक्ष आबासाहेब चौधरी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष रविद्र नेरपगारे व सुत्रसंचलन प्रा. राजेंद्र खोरखडे यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास भुसावल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, एंरडोंलसह अन्य तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव कुमार सिरामे, संजय सोनवणे, योगेश वाघ, अरुण श्रीखंडे, भीकन बोरसे, राजकुमार गवळी यांनी प्रयत्न केले.