मनपा आयुक्तांवर अविश्वास ठरावासाठी विशेष महासभा बोलवा : नगरसेवक नाईक

जळगाव, प्रतिनिधी  ।  जळगाव शहराच्या विविध समस्या सोडविण्यात आयुक्त अपयशी ठरल्याने  विशेष महासभेचे आयोजन करून  त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  

 

निवेदनाचा आशय असा की,   जळगाव शहर महानगरपालिकेने स्थापत्या एजन्सी यांचे मार्फत मालमत्ता कराची वसुली करणे कामी सुमारे रुपये १० कोटी मात्रचा मक्ता दिलेला आहे. प्रत्यक्षात झालेला खर्चानुसार वसुली  उद्दीष्ट अद्याप पावेतो होत असलेल्या दिसून येत नाही. शासनाने मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत मंजूरी मिळून देखिल लावण्यात आलेला नाही. अनेक वर्षापासून जळगाव मनपात अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रीया राबविण्यात आलेली नाही. अनेक वर्षापासुन शिवाजी नगर उड्डाण  पुला संबंधीत कामे पूर्ण झालेल नाहीत, परिणामी उड्डाण  पुलाचे काम रखडलेले आहे. अमृत पाणी पुरवठा, मलनिस्सारण योजना मुदत संपुनही अपुर्ण आहे. मनपा फंडातील रस्ते, गटारीसाठी (सन २०२०-२५) राखीव असलेला निधी अंतर्गत रुपये ९.५० कोटी मात्रचे  रस्ते दुरूस्ती करण्यात आले, मात्र रस्त्यांची दुरुस्ती दिसून येत नाही. यामध्ये आयुक्त यांनी स्वतः दुकानदारी केल्याचे समजते. याबाबत आयुक्त यांनी कोणत्याही प्रकारचा सकारात्मक विचार करुन गांभीयाने कामे हाताळणी करीत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मनपा घनकचरा बायोमायनिंग प्रकल्पाचे कामाचे तिनतेरा वाजवून टाकलेल आहे. मनपा वाणिज्य संकुलातील गाळ्यांचा प्रश्न अद्यापपावेतो प्रलंबितच ठेवला आहे आयुक्त म्हणुन त्यांनी जळगाव शहरात कोणत्याही प्रकारची पाहणी करुन शहरवासियांच्या अपेक्षा जाणुन घेतलेल्या नाहीत. याबाबत त्यांचे विषयी सर्व सन्मा. नगरसेवकामध्ये समाधान दिसून येत नसून फक्त रोषच व्यक्त होत आहे.  वर नमुद सर्व बाबींना महानगरपालिका प्रमुख म्हणुन आयुक्तच जबाबदार आहे त्यांचेच दिरंगाई व निराशावादी धोरणांमुळेच जळगांव शहराचा विकास खुंटला आहे करीता आपणास उपरावत नमुद कामी विनती करण्यात यत की, जळगांव मनपाचे आयुक्त  सतीश कुलकर्णी यांचे अविश्वास प्रस्ताव सादर करणे कामी विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.

Protected Content