रक्षाताईंना पाच लाखांचे मताधिक्य मिळणार : रोहिणी खडसे ( व्हिडीओ )

0
72


रावेर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांना यंदाच्या निवडणुकीत पाच लाखांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला. त्या रावेर तालुक्यातील प्रचाराच्या दरम्यान लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या.

ऐन रणरणत्या उन्हात प्रचारफेर्‍या सुरू असून यात खासदार रक्षाताई खडसे यांच्यासाठी तालुक्यातून मोठी फळी कार्यरत आहे. यातच आता त्यांची नणंद तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनीदेखील त्यांची प्रचारात सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांनी प्रचार फेर्‍यांच्या माध्यमातून विविध गावे पिंजून काढण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आज रोहिणीताईंनी रावेर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार केला. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी आपल्या प्रचार फेर्‍यांबाबत माहिती दिली.

रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊ यांनी आजवर केलेली कामे आणि रक्षाताईंच्या गत पाच वर्षातील कामगिरीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात आम्हाला अनुकुल वातावरण आहे. गेल्या वेळेपेक्षाही जास्त म्हणजे तब्बल पाच लाखांपेक्षा जास्तचे मताधिक्य यंदा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण मतदारसंघ हे खडसे कुटुंबासारखे असून सर्वच जण रक्षाताईंसाठी प्रचार करत असून याचे फळ मिळणारच असा विश्‍वासदेखील त्यांनी व्यक्त केला. तसेच नाथाभाऊ हे दोन दिवसांमध्येच प्रचारात सक्रीय होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

पहा : नेमक्या काय म्हणाल्या रोहिणीताई खडसे !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here