Home क्राईम पोलीस ठाण्यातच दारूड्या युवकांमध्ये ढिश्युम-ढिश्युम !

पोलीस ठाण्यातच दारूड्या युवकांमध्ये ढिश्युम-ढिश्युम !

0
26
maramari 1

जामनेर प्रतिनिधी | श्रावण लागण्याआधी यथेच्छ मद्यपान केलेल्या तरूणांच्या दोन गटांमधील वाद पोलीस स्थानकापर्यंत पोहचून तेथेच जोरदार हाणामारी झाल्याची घटना रात्री घडली आहे.

काल आषाढी अमावस्येनिमित्त परमीटररूम, हॉटेल्स आणि ढाब्यांवर तुफान गर्दी उसळली होती. यातच जामनेर-भुसावळ रोडवरील बियर बारमध्ये तरूणांच्या दोन गटांमध्ये शाब्दीक वाद झाले. हे वाद जामनेर पोलीस स्थानकातपर्यत पोहचून दोन्ही गट तेथे जमले. पोलीस त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतांनाच तेथेच दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी समजूत काढून पोलीसांनी त्यांना परत पाठविले.

पोलीस स्थानकातून परतलेल्या युवकांच्या गटांमध्ये भुसावळ चौफुलीवर पुन्हा तुफान हाणामारी सुरू झाली. यामुळे पोलिसांनी तेथे धाव घेत लाठीमार करून त्यांना हुसकून लावले. मात्र या प्रकारामुळे रात्री उशीरापर्यंत गोंधळ उडाल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound