Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज ३ संक्रमित रूग्ण आढळले; १४ रूग्ण झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज ३ संक्रमित रूग्ण आढळले; १४ रूग्ण झाले बरे !


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे. 

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३ बाधित रूग्ण आढळले यात जळगाव शहरातून एक तर चाळीसगाव तालुक्यातून दोन असे रूग्ण आढळले आहे. जिल्हा कोरोना अहवालानुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ४२ हजार ६३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २२ रूग्ण बरे होवून घरी परतले तर ३४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहितील जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविली आहे. 

 


Protected Content

Play sound