Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज १० संक्रमित रूग्ण आढळले; १६ झाले बरे !

कोरोना : जिल्ह्यात आज १० संक्रमित रूग्ण आढळले; १६ झाले बरे !

0
34

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात  १० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले  आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविली आहे.

 

कोरोना अहवालानुसार जळगाव तालुक्यात ( ग्रामीण ), पारोळा आणि पाचोरा तालुक्यात प्रत्येकी  एक , चाळीसगाव , भुसावळ व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी दोन आणि जिल्ह्याबाहेरील एक   असे एकुण १० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरासह उर्वरित ९  तालुके  निरंक असल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६२८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख  ४० हजार ०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर  ४५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

 


Protected Content

Play sound