सामाजिक उपक्रमांनी प्रताप पाटील यांचा वाढदिवस साजरा

 

यावल :  प्रतिनिधी ।  जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांचा ५६ वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह  ३० हजार किलोमीटर सायकल प्रवासाच्या संकल्पपूर्तीने साजरा करण्यात आला

 

विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जळगावच्या सायकलिस्ट ग्रुपतर्फे वृक्षरोपण ,गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि ५६ सायकलिस्टसह ५६ किलोमीटरचा प्रवास करत आजच्या दिवशी तीस हजार किलोमीटरचा पल्ला गाठत उत्साहात हा ५६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

प्रतापराव पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वयंदीप प्रतिष्ठान ( डांभुर्णी , ता – यावल) चा अहवाल प्रतापराव पाटील यांच्या हस्ते व  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला .

 

आपल्या छंदाचा सुयोग्य वापर प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासोबतच आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामाच्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी  करण्याची  सुरेख सांगड घालणारे कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी प्रतापराव पाटील  आहेत पाटील यांच्या पुढाकाराने जळगावमध्ये मोठा सायकलिंग ग्रुप उभा राहिला विविध क्षेत्रातील मान्यवर जोडले गेले आणि  समाजासाठी अनेक सकारात्मक निर्णय  व  सर्वांचे आरोग्य असे अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे या माध्यमातून होताना दिसत आहेत. अशा  भावना यावेळी  हितचिंतकांनी व्यक्त केल्या

 

 

मराठा  सेवा संघ ( जळगाव ) , स्वयंदीप प्रतिष्ठान ( डांभुर्णी ) व  दीपस्तंभ फाउंडेशन (जळगाव )  यांनीही  प्रतापराव पाटील यांना शुभेच्छा  दिल्या आहेत .

Protected Content